रॉबर्ट वाड्रा यांनी केली पुष्टी
नवी दिल्ली (Manmohan Singh News) : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे आज दुःखद निधन झाले. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी याची पुष्टी केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, 92 वर्षीय मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये अखेरचा श्वास घेतला.
बराच काळापासून होते आजारी
मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना गुरुवारी रात्री 8 वाजता दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंह यांना अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.