आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट
देऊळगाव(Deulgaon) Manoj Jarange:- परभणीच्या देऊळगाव गात येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरागे (Manoj Jarange) पाटील यांनी दिनांक एक मे रोजी दुपारी 3:30 दरम्यान मराठा आरक्षण मिळावे याकरिता दिनांक 16 एप्रिल रोजी देऊळगाव गात येथील बाबासाहेब गायकवाड यांनी पळसाच्या झाडाला स्वतःच्या शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केली त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आई-वडिलांची भेट घेऊन चौकशी करून कुटुंबाला धीर दिला.
मराठ्यांच्या मुलांनी रडायचे नाही तर लढायचे
मनोज जरांगे पाटील यांनी जाता जाता एका लग्न (marriage) कार्यास भेट देऊन वधू वरास आशीर्वाद देऊन उपस्थित मंडळींना व तरुणांना मराठा आरक्षण मिळावे यासाठी रडायचे नाही तर लढायचे कोणीही आत्महत्या करू नये आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना आई-वडिलांना काय दुःख होते त्या कुटुंबावर काय दुःख कोसळते हे सहन होणे शक्य नाही त्यामुळे रडायचे नाही तर लढायचे असा मोलाचा संदेश दिला.