परभणी (Parbhani):- मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)हे रविवार ७ जुलै रोजी परभणी जिल्हा दौर्यावर येत आहेत.यांच्या उपस्थितीत रविवारी भव्य रॅली(Rally) काढण्यात येणार आहे. रॅलीसाठी येणार्या नागरीकांची अडचण होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शुक्रवार ५ जुलै रोजी अधिसूचना काढली आहे.
पोलीस अधीक्षकांनी काढली अधिसूचना
रविवार ७ जुलै रोजी मनोज जरांगे पाटील परभणी जिल्हा दौर्यावर येणार आहेत. शहरातील विसावा चौकी पाथरी रोड येथून रॅली सुरू होईल. जेल कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, पोलीस पेट्रोलपंप, आंध्रा बँक, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली निघणार आहे. दरम्यान वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून परभणी शहरातील वसमत रोड, गंगाखेड रोड, जिंतूर रोड, पाथरी रोड मार्गे येणारी वाहने ७ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील. या रस्त्यावरील जड वाहनांची रहदारी बंद करण्यात आली आहे.
सदर कालावधीत ही वाहने इतर मार्गाने वळविण्यात आली आहेत. हिंगोली- वसमत मार्गे येणारी जड वाहने झिरोफाटा, पूर्णा, ताडकळस, सिंगणापुर फाटा, उमरी फाटा, पाथरी मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.वसमत हिंगोली कडून गंगाखेडकडे जाणारी वाहने याच मार्गे सिंगणापुर, पोखर्णी दैठणा – गंगाखेड मार्गे परळीकडे जातील. गंगाखेडकडून जिंतूरकडे जाणारी वाहने पोखर्णी मार्गे पाथरी, सेलू, देवगाव फाट्याकडून जिंतूरकडे जातील. पाथरी माजलगाव मार्गे नांदेडला जाणारी वाहने पोखर्णी, सिंगणापुर फाटा, ताडकळस, पूर्णा, चुडावा मार्गे नांदेडकडे जातील. जिंतूर येथून गंगाखेडकडे जाणारी वाहने देवगाव फाटा, सेलू, पाथरी, पोखर्णी, दैठणा मार्गे गंगाखेडकडे रवाना होतील.
या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीसाठी येणारे नागरीक वाहने घेवून येणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी पार्विंâगची व्यवस्था करण्यात आली आहे. रॅली, संवाद यात्रा आदीसाठी पार्विंâग व्यवस्था देण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणीच नागरीकांनी आपली वाहने उभी करावीत, वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यता आले आहे.