परभणी (Parbhani):- मराठा समाज आरक्षण विषयावर मनोज जरांगे (Manoj Jarange)पाटील ७ जुलै रोजी परभणी दौर्यावर येणार आहेत. त्या निमित्त जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची बैठक सोमवार २४ जून रोजी सकाळी १० वाजता पाथरी रोडवरील राजलक्षमी लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
२४ जूनच्या बैठकीस समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
राज्यात मराठा ओबीसी (OBC)आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा सगे सोयर्याची अंमलबजावणी करण्यासाठी पेटला आहे. ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी देखील ओबीसी समाजाकडून केली जात आहे. आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा ओबीसी आरक्षणमध्ये सगे सोयर्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा (Dialogue tour)राज्यभर चालू आहे. यात ते मराठा समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. ७ जुलै रोजी जरांगे पाटील जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी संवाद रॅली व रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर, वकिल, सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज बांधवांनी बैठकीला हजर राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या(Maratha society) वतीने करण्यात आले आहे.