हिंगोली (Manoj Jarange) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगे सोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षण संवाद रॅलीचे (Maratha Reservation Rally) आयोजन केले असून या रॅलीचा ६ जुलै शनिवार रोजी श्रीगणेशा हिंगोलीतून होत आहे. या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची उपस्थिती राहणार आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागील नऊ महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलन केले.
मराठा आरक्षण संवाद शांतता रॅलीनिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे उद्या हिंगोलीत
या मागणीसाठी शासन चालढकल करीत असल्याने ६ ते १३ जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षण संवाद रॅली (Maratha Reservation Rally) शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्या निमित्ताने आज ६ जुलै रोजी हिंगोलीत मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त सकल मराठा समाजाच्यावतीने या (Maratha Reservation Rally) रॅली संदर्भात ५ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत घेतली. ज्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारी सकाळी १० वाजता हिंगोलीत आगमन होणार असून बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. यानंतर (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होणार असून या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार, यावेळी ५१ उखळी तोफांची सलामी दिली जाणार आहे. याच चौकातून ही रॅली काढली जाणार आहे. ज्या-ज्या मार्गावर महापुरूषांचे पुतळे आहेत त्यांना मनोज जरांगे पाटील हे अभिवादन करणार आहेत. ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढली जाणार असून लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहील असा अंदाज सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
वाहन तळासाठी व्यवस्था:-
जवळा पळशी रोड आरके मार्केट परीसर, रेल्वे स्टेशन/मार्केट कमेटी मैदान, अकोला रस्त्यावरील रेल्वे स्थानककडील मैदान, कळमनुरी रस्त्यावरील जि.प.मैदान, एनटीसी परीसर, राजीव सातव सभागृह परीसर, पोलिस कवायत मैदान, लालालजपतरायनगर मैदान, तिरूपतीनगर, आदर्श कॉलेज मैदान, जुने पोलिस अधिक्षक कार्यालयाचे मैदान या परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त
रॅली निमित्ताने जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील या बंदोबस्त अधिकारी असून त्यांच्यासह ५५ पोलिस कर्मचारी, हिंगोली जिल्हा पोलिस दलातील ४५० कर्मचारी तर लातुरहून १५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. आठ जिल्ह्यात रॅली हिंगोलीत ६ जुलै, परभणीत ७ जुलै, नांदेड ८ जुलै, लातुर ९ जुलै, धाराशिव १० जुलै, बीड ११ जुलै, जालना १२ जुलै व संभाजीनगरात १३ जुलैला (Maratha Reservation Rally) मराठा संवाद रॅली काढली जाणार आहे. रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली पोस्टऑफीस, आखरे मेडिकल, खुराणा पेट्रोलपंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, म.गांधी चौक येथून इंदिरा गांधी चौकात संवाद साधणार आहेत त्या ठिकाणाहून संवाद यात्रा विसर्जित होईल…