पुसद (Manoj Jarange Patil) : पुसद तालुक्यातील सकल (Maratha samaj) मराठा समाज बांधव यांच्यावतीने दि.12 जून रोजी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल विविध मागण्यांचे शासनाला यांच्यामार्फत निवेदनदेण्यात आले. निवेदनात ते म्हणतात की, मराठा योद्धा (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, सगे सोयऱ्याची अट मान्य करावी याकरिता उपोषण करीत आहेत. मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. (Maratha samaj) मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुसद सकल मराठा समाजाच्या वतीने विभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन
निवेदनावर सकल (Maratha samaj) मराठा समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव संभाजी टेटर, पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, नितीन पवार, शिवाजीराव देशमुख, प्रकाश लामने, दीपक महाडिक, हर गोविंद कदम, अनिल चव्हाण पाटील, संजय ठाकरे पाटील, प्रवीण कदम, परेश पांगारकर, मंदाताई इंगोले, छाया देशमुख, शुभांगी पानपट्टे, संतोष भेंडे,शिवाजी कदम, विलास पाटील, गुणवंत ठेंगे,गिरधर ठेंगे, संतोष कदम, सौ सुरेखा कदम, गणेश रावते, पंजाबराव वानखेडे, अर्चना ठाकरे, यामिनी ठाकरे, अविनाश कदम, चक्रधर मुळे, वैभव गावंडे, गजानन काकडे, संतोष चव्हाण, प्रल्हाद शिंदे, शिवाजी पवार, दीपक चव्हाण, प्रतीक चव्हाण, प्रभाकर पाटील, गजानन ठाकरे, बाबाराव सूर्यवंशी, साहेबराव जाधव, बाबाराव माने, विनय पोळ, कैलास भोसले, संजय असोले, सुशील वानखेडे, राजेंद्र शिंदे, माधवराव आळणे, अविनाश अडकिने, करण पानपट्टे, कृष्णा पंजाबराव देशमुख, सचिन सुरोशे, सुनंदाताई वांजाळ, दीपक काळे, विष्णू घुगे, आनंद करडे, गुलाबराव जामगडे यांच्यासह इत्यादी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.