हिंगोलीत पहिल्या संवाद रॅलीत मनोज जरांगेंचा थेट इशारा
हिंगोली (Manoj Jarange Patil) : १३ जुलैपर्यंत राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून (Maratha Reservation) मराठा आरक्षण दिले नाही तर राज्यात २८८ जागा लढविणार किंवा २८८ उमेदवार पाडणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हिंगोलीत दिला. मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या संवाद रॅलीच्या हिंगोली जिल्ह्यातील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सग्या सोयर्यांची अंमलबजावणी सरकारनेच करावी आणि सरकारनेच टिकवावी, आम्हाला राजकारण करायचे नाही; पण आमची मागणी मान्य झाली नाही तर राज्यात २८८ जागेवर उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे, हे सामुहिकरित्या ठरविले जाणार असल्याचे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केले.
मराठा समाज एकत्रित आल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्रित आले आहेत. मराठ्यांना चारही बाजूने घेरले जात आहे. यापुढे मला बदनाम करण्याचे प्रयत्न होतील, मला एकटा पाडण्याचा प्रयत्न होईल, फक्त (Maratha Reservation) मराठा समाजाने आपले पाठबळ माझ्या मागे असू द्यावे एवढीच विनंती करायला मी आलो आहे, असे म्हणून जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्र ही छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. मराठ्यांना आडवे जाल तर मराठे आडवा पाडतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांनी गोरगरीब ओबीसींवर चालून जाऊ नये तसेच ओबीसींनीही मराठ्यांच्या अंगावर जाऊ नये, आरक्षण मराठ्यांसहीत मुस्लिम व ब्राम्हणांनाही मिळाले पाहिजे, अशी मागणीही (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी केली. हिंगोलीतील आयोजना बाबत कौतुक करताना जरांगे पाटील यांनी हिंगोलीकरांचे धन्यवाद व्यक्त केले.
मराठा आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या योग्यच
१९६७ ला देशभरातील १८० जाती ओबीसीमध्ये घालण्यात आल्या. त्यात ८३ क्रमांकावर कुणबी घातला गेला. आज १८० च्या साडेतिनशे ते चारशे जाती ओबीसी गटात झाल्या. त्यावेळी या गटात घातलेल्या १८० जातीच्या सर्व पोटजाती पुढे सामावून घेण्यात आल्या; परंतु ८३ क्रमांकावर घातल्या गेलेल्या कुणबी जातीची एकही पोटजात वाढविण्यात आली नाही. जशा १८० च्या चारशे झाल्या तशा एक कुणबीच्या दोन-चार का वाढवू शकत नाही, असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तांत्रिकदृष्ट्या (Maratha Reservation) मराठा समाजाची मागणी कशी योग्य आहे हे सांगितले.