लातूरच्या विराट सभेत जरांगे पाटील यांची सरकारवर चौफेर टीका
लातूर (Manoj Jarange Patil) : आतापर्यंतच्या इतिहासात मराठ्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही, परंतु आता (Maratha Arakshan) मराठ्यांना जातीयवादी आहेत, असा बनाव करून देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना पुढे करून जातीपातीचे राजकारण करत आहेत, याला मराठे अजिबात भीक घालणार नाहीत. आम्ही त्यांचे राज्यात दंगल घडवून आणण्याचे मनसूबे उधळून लावू, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. (Latur awareness rally) लातूर येथील भव्य जनजागृती रॅलीस संबोधित करताना ते बोलत होते.
मराठा आंदोलनाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची लातुरात जंगी जनजागृती रॅली झाली. शहरातील विवेकानंद चौक येथून सुरु झालेल्या रॅलीत हजारोच्या संख्येने सकल मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास तसेच मराठा कुणबी एकच जात असल्याची मागणी सरकारने मान्य न केल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा करत राज्यातील सर्व जातींना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याचा इशारा दिला. राजकारण माझा मार्ग नाही. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला (Maratha Reservation) मराठा समाजातील पोरं मोठी करायची आहेत.
समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उभे करून गोरगरिबा उमेदवारांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचं हे स्पष्ट सांगेन, असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. (Maratha Reservation) मराठा समाज एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली असून हे तुमच्यासाठी संकेत आहेत. तेव्हा माझ्या नादी लागू नका. सरकारकडे माझी एकच मागणी आहे. सगेसोयरे अंमलबजावणी करा आणि मराठा व कुणबी एकच जात असल्याचे मान्य करा. सरकारने धनगर समाजाला फसवलं, मराठ्यांना फसवलं. सरकारशी आमचं वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. मराठ्यांसोबत अन्य ४-५ जाती एकत्र आल्या तर १०० टक्के सत्ता खेचून आणेन असे सांगत सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
बीड जिल्ह्यातील राजकारणाबाबत जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, राज्यात मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही. समाजाचं काम सोडून मला अन्य कशासाठी वेळ नाही. धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं वाटत होते. परंतु गेल्या २-३ दिवसांत मला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत. ही परतफेड असेल तर पुढे विधानसभेला बघू. तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचंय लक्षात ठेवा. (Maratha Reservation) मराठा एकजूट आहे. अन्याय सहन करत नाहीत. असा निशाणा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्यावर साधला. यावेळी (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी लातूरकर मराठ्यांना भावनिक आवाहन करत संयम ठेवा मी आरक्षण मिळवून देतो असे आश्वासन दिले.