हिंगोली (Manoj Jarange Patil) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती शांतता रॅलीनिमित्त हिंगोली येत आहेत. लाखो जनसमुदाय रॅलीत सहभागी होणार असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने १ हजार पुरुष तर दोनशे महिला स्वयंसेवकांना (Maratha Volunteers) प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दुसर्या सत्रात मार्गदर्शन करून उपस्थित स्वयंसेवका सोबत संवाद साधला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे शांतता रॅलीच्या निमित्तांना हिंगोली शहरात येत असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. संपुर्ण शहर भगवेमय झाले आहे. साऊंड सिस्टीम उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रॅलीसाठी टेहाळणी टॉवर व इतर कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. गुरुवार दि.४ जुलै रोजी शहरातील सिटी क्लब मैदानावर रॅलीमध्ये शिस्तीकरिता नियुक्त स्वयंसेवकांना (Maratha Volunteers) प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये एकुण १२०० स्वयंसेवक रॅलीवर नियत्रंणासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
भगव्या ड्रेस कोडमध्ये रॅलीच्या भागासह शहरात स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. दोनशे महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आल्या असुन त्यांची सुरक्षा ही महिलांसह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनाही राहणार आहे. जिजाऊंच्या लेकी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सुरक्षा कवच होत असल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. रॅलीसाठी आवश्यक बाबी, आचारसंहिता, शिस्त याविषयावर तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्राची सुरुवात छत्रपती शिवरायांचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पडळकर यांच्यासह तब्बल बंदोबस्तासाठी तैनात असलेले जिल्हयातील चाळीस पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील रॅली दरम्यान संपुर्ण शहर व जिल्हयात पोलिस बंदोबस्ताची माहिती दिली. स्वयंसेवक, आयोजन समितीतील समन्वयक, मराठा सेवक व जवाबदारी घेतलेले मराठा बांधव यांच्याशी पोलिसांचा समन्वय ठेवावा असे आवाहन केले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी शांतता रॅलीतील आवश्यक बाबी व बंदोबस्त रॅलीत शांततेत होण्यासाठी विविध बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी यांची ओळख व तैनात पॉईंट यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी मराठा स्वयंसेवक, (Maratha Volunteers) महिला स्वयंसेवक, आयोजन समितीतील समन्वयक व सदस्य यांची मोठी उपस्थिती होती.