हिंगोलीत मनोज जरांगे पाटील यांची पहिली रॅली
हिंगोली (Manoj Jarange Patil) : येथून मराठा आरक्षण (Maratha reservation) संवाद रॅलीला सुरूवात झाली. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विचार ऐकण्याकरीता लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव हिंगोलीत शनिवारी दाखल झाले होते. यामुळे शहरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने भरले होते. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मराठा आरक्षण संवाद रॅलीचे (Hingoli rally) आयोजन केले असून, त्याचा श्रीगणेशा ६ जुलैला हिंगोलीतून झाला. कोणत्याही चळवळीत हिंगोलीचे नाव अग्रक्रमावर असते.
सध्या (Maratha reservation) मराठा आरक्षणाकरीता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जिवाचे रान केले असून अनेक वेळा उपोषण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विडा उचलला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच, हाच ध्यास मनी धरून अनेक ठिकाणी संवाद रॅली काढली जाणार आहे. पहिल्याच टप्प्यात हिंगोलीतून ही रॅली प्रारंभ झाली. (Hingoli rally) रॅली निमित्त सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला, पुरूष, युवक, युवती मिळेल त्या वाहनाने दाखल झाले होते. अनेकांच्या हातामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीचा जयघोषही केला जात होता.
हिंगोली शहरामध्ये लाखोंच्या संख्येने सकल (Maratha reservation) मराठा समाजाचा जनसागर उलटला असताना कुठेही अनुचित घटना घडली नाही. विशेष म्हणजे शहरातील प्रमुख रस्त्यावर आयोजकांनी लावलेल्या ध्वनीक्षेपकामुळे अनेक नागरीक मिळेल त्या ठिकाणी उभे राहून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विचार ऐकू लागले. विशेष म्हणजे इंदिरा गांधी पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास एक तास केलेल्या भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याच्या घोषणा ऐकावयास मिळत होत्या. दिवसभर शहरातील प्रमुख रस्ते महिला, पुरूष, युवक, युवतींच्या उपस्थितीने भरून दिसून आले. या दरम्यान पोलिसांसह सकल मराठा समाजाच्या स्वयंसेवकांनीही व्यवस्थित बंदोबस्त हाताळला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी हिंगोलीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली पहिली मराठा आरक्षण संवाद रॅली यशस्वी पार पडली. शिस्तबद्ध नियोजन हिंगोलीत लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव रॅलीला आले असताना योग्य नियोजन केल्याने कुठेही विस्कळीतता झाली नव्हती. पावसाचीही हजेरी (Hingoli rally) रॅलीला मोठ्या संख्येने नागरीक आले. याचवेळी पाऊस काही वेळ पडला तरी नागरीक मात्र रस्त्यावरच बसून होते.