मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले बॅनर फाडले
परभणी (Manoj Jarange Patil) : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरूवात झाली आहे. शहरातील सर्वच रस्ते जाम झाले असून लाखोंचा समुदाय रॅलीत सहभागी झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात परभणी शहरात रविवार ७ जुलै रोजी मराठा आरक्षण (Maratha reservation) जनजागृती व शांतता रॅलीला सुरूवात झाली आहे.
शहरातील सर्वच रस्ते जाम
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)हे हिंगोली येथून परभणीकडे येत असतांना ठिक-ठिकाणी करण्यात येणार्या स्वागत सत्कारामुळे शहरात पोहोचण्यास उशिर झाले ते दुपारी १ वाजता खानापूर फाटा येथे पोहोचले. त्यांनी वसमत रोड मार्गे शहरात प्रवेश केल्यानंतर वसंतराव नाईक, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत नुतन महाविद्यालयाच्या मैदानाकडे रवाना झाले.
जागोजागी मुस्लिम बांधवाकडून पाणी नाश्त्याची सोय
त्यानंतर महाराणा प्रताप चौक येथून भव्य अशा रॅलीला सुरूवात झाली असून ही रॅली नानलपेठ, गांधी पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहचणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून (Maratha reservation) मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे संबोधित करणार आहेत. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लाखोंच्या समुदायामुळे शहरातील वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, पाथरी रोडवरील वाहतुक ठप्प झाली असून शहरातील सर्व मुख्य रस्ते सहभागी झालेल्या जनसमुदायामुळे जाम झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे बॅनर फाडले
शहरात मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर रायगड कॉर्नर येथे लावण्यात आले होते. या बॅनरवर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह श्रीकांत शिंदे यांचा फोटो होता. ते फोटो असलेले बॅनर उपस्थित संतप्त समुदायाने फाडले.