मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांची उपस्थिती
परभणी/पाथरी (Manoj Jarange Patil) : मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थित येत्या ७ जुलै रोजी परभणीत होणार्या (Maratha Reservation) मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीमध्ये पाथरी तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित रहावेत यासाठी पाथरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील मराठा समाजातील प्रत्येक कुटूंबातील महिला पुरुष यांनी लाखोंच्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
७ जुलै रोजी परभणीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली
मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण (Maratha Reservation) व सगेसोयरे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी पहिली रॅली हिंगोली जिल्ह्यात होणार आहे.
रविवार ७ जुलै रोजी परभणी शहरातील नुतन महाविद्याल्यापासुन ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरापर्यंत हि रॅली निघणार आहे . याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार १ जुलै रोजी शहरातील जागृत हनुमान मंदिरामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाथरी तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद सर्कल मधील गावांमध्ये विविध माध्यमांने जनजागृती केली जाणारा असून प्रत्येक गावामध्ये मराठा बांधवांच्या बैठकीचे आयोजन करत परभणी येथे होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.
पाथरीतील बैठकीत मराठा बांधवांचा संकल्प
पाथरी तालुक्यातील मराठा बांधवांच्या कुटुंबातील महिला व पुरुष घराबाहेर पडून ७ जुलै रोजी (Maratha Reservation) मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने सामील होतील असा निर्धार यावेळी सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे. बैठकीला मोठ्या संख्येने सकल मराठा बंधू उपस्थित होते.