नाशिक (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या व (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे-पाटील यांची कहाणी ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या (Sangharsha Yoddha) चित्रपटाच्या नाशिकमधील शोसाठी मोठी गर्दी उसळली. विशेष म्हणजे शो पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात भगवी टोपी घालूनच आत प्रवेश दिला जात होता.
आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या सौजन्याने सिटी सेंटर मध्ये हा शो आयोजित करण्यात आला होता. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची, तर गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह लेखनाची जबाबदारी स्वीकारली आहे. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा दिला, त्याची माहिती सर्वांना व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या (Sangharsha Yoddha) चित्रपटाची निर्मीती करण्यात आली. जय शिवराय उद्योग समूहाचे चेअरमन तुषार जगताप यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. मनोज जरांगे यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील याने समर्थपणे साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भूमिका अभिनेता संजय कुलकर्णी, तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. या दोघांनीही आपापल्या भूमिकांत अक्षरशः जीव ओतला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, अभिनेत्री सुरभि हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनित भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शहरात आयोजित या (Sangharsha Yoddha) चित्रपटाचा शो बघण्यासाठी मराठी समाजाचे नेते करण गायकर, संजय शिंदे, प्रा. माणिकराव गायकवाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
