हिंगोली (Manoj Jarange Patil) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनला आमरण उपोषण सुरू केल्याने हिंगोली जिल्ह्यातील सकल (Maratha samaj) मराठा समाजात तर्फे या उपोषणाला पाठिंबा दर्शवून शासनाने दोन दिवसाच्या आत दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज आक्रमक
याप्रकरणी सकल (Maratha samaj) मराठा समाजाच्यावतीने ११ जून रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले की, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले असताना शासनाकडून त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा कुणबी एकच आहेत त्यांचा आदेश काढावा, सुडाच्या भावनेतून हजारो मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅजेट लागू करावे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन समितीचे काम सुरूच ठेवावे, ज्या (Maratha samaj) मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहे. त्याचा डाटा प्रसिद्ध करावा, जातीय तेढ निर्माण करण्याच्या वाईट उद्देशाने सोशल मिडीयावर व जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणार्यावर व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी, जात पडताळणी समिती हिंगोली येथील मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी त्वरीत करून द्यावी या मागण्या दोन दिवसात मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात अनेक सकल (Maratha samaj) मराठा समाज सहभागी होते.