परभणी (Manoj Jarange Patil) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.मात्र गुरुवार १३ जून रोजी ना. शंभूराज देसाई, खा. संदीपान भूमरे यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लढा उभारला आहे. मात्र शासन चालढकलपणा करत आहे.
परभणी जिल्हा बंदचा निर्णयही मागे घेतला
लोकसभा निवडणूकीनंतर (Lok Sabha Elections) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटे येथे पुन्हा उपोषण सुरु केले होते. मात्र शासन प्रश्न मार्गी लावण्यास टाळाटाळ करीत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त केला जात होता. परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाने शुक्रवार १४ जून रोजी जिल्हा बंद पुकारला होता. मात्र गुरुवारी दुपारी ना. शंभूराज देसाई, खा. भूमरे, आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत चर्चेअंती एक महिन्याच्या आत (Maratha Reservation) मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढण्यास विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करण्यात आले असून, शुक्रवारचा परभणी जिल्हा बंदही मागे घेण्यात आला आहे.