समाज अडचणीत असताना स्वस्थ बसणार नाही…
बुलढाणा (Manoj Jarange) : मराठा समाजाचे विविध सामाजिक उपक्रम व मराठा सोयरीकच्या माध्यमातून राज्यभर चीर परिचित असणारे सुनील जवंजाळ पाटील (Javanjal Patil) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला बळ देणार असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आरक्षणावर लढा उभा केला आहे.तर सामाजिक संघटन व विवाह चळवळीच्या माध्यमातून सुनील जवंजाळ पाटील (Javanjal Patil) यांनी राज्यभर कार्य केले आहे. जरांगे पाटील यांची भूमिका ही समाज हिताची असल्याने त्यांच्या भूमिकेला राज्यभर घेवून जावू व विधानसभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभे करू असे सुनील जंजाळ यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा लढा उभा करून गरजू मराठ्यांचा आवाज गल्ली पासून दिल्लीपर्यंत पोहोचविणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या भूमिकेला बुलढाणा जिल्ह्यातील समाज बांधव बळ देतील.
या सह राज्यभर ही चळवळ उभी करून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मराठा सोयरीक चे संस्थापक अध्यक्ष सुनील जवंजाळ पाटील (Javanjal Patil) म्हणाले. निवडणुकांचे वारे वाहत असताना गरजू मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मात्र बाजूला पडला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्यभर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी लढा उभारला. केंद्र आणि राज्यात प्रस्थापित विद्यमान सरकारने जरांगे यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. निवडणुका आल्या की सर्वांनाच मराठा समाज आठवतो, परंतु जेव्हा मराठा समाजाला , मराठ्यांच्या मुलांना द्यायची वेळ आली तेव्हा सर्वांनीच हात वर केले. विशेषता: मराठा समाजाचे नेते म्हणणारे गरजू मराठ्यांपासून दूर गेले आहे. त्यांनी समाजाचा प्रश्न ताकतीने मांडला असता तर जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना संघर्ष करण्याची वेळ आली नसती. नेते फितूर झाले मात्र मनोज जरांगे यांनी हा लढा निकराने लढला.
जोपर्यंत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू असल्याचे मनोज जारंगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले आहे. यासाठीच त्यांनी राजकीय आयूधाचा वापर करण्याचे ठरवले असून ज्या ठिकाणी पाठबळ आहे अशा ठिकाणी उमेदवार जिंकवणे तर ज्या ठिकाणी पाठबळ कमी आहे अशा ठिकाणी पाडणे असा अजेंडा आहे. जिंकणे व पाडणे या अजेंड्याचा वापर बुलढाणा जिल्ह्यातही होणार असून गरजू मराठा समाज बांधव जरांगे यांच्या भूमिकेला नक्कीच बळ देतील. यासाठी आमच्यासारखे तळागाळातील घटक जोमाने कामाला लागतील असे जवंजाळ पाटील (Javanjal Patil) यांनी म्हटले आहे. जरांगे यांचे आवाहनानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही अर्ज दाखल करणार आहोत असे सुनील जंजाळ यांनी म्हटले आहे.
प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ येतात. या सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची संख्या मोठी आहे. घाटाखालील दोन मतदारसंघ सोडल्यास इतर मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे मतदान हे निर्णयक ठरू शकते. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी समाजाचा लढा उभारला आहे. अशा वेळी जरांगेंचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास याची सर्वात मोठी अडचण प्रस्थापित मराठा नेत्यांनाच होऊ शकते. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांसाठी जरांगे फॅक्टर हा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो.