मी कोणाच्याही विरोधात नाही- पंकजाताई
देऊळगावराजा (Pankaja Mundhe) : सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज देवानंद कायंदे (Manoj Kayande) यांनी १३ नोव्हेंबर रोजी भाजपाच्या नेत्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंढे (Pankaja Mundhe) यांचे लोणार येथे आशिर्वाद घेतले. त्यानंतर सिंदखेडराजा येथे झालेल्या सभेत मी कोणाच्याही विरोधात नसल्याचे पंकजाताईंनी स्पष्ट केले.
पंकजाताई मुंढे (Pankaja Mundhe) या आज लोणार व सिंदखेडराजा येथे प्रचार दौर्यावर होत्या. हेलिकॉप्टरने बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे लोणार येथे आगमन झाले असता, मनोज देवानंद कायंदे (Manoj Kayande) यांनी त्यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी मनोज कायंदे यांनी पंकजाताई यांचे आशिर्वाद घेतले.
माझ्याकडे घड्याळ, मीच महायुतीचा- कायंदे
पंकजाताई मुंढे (Pankaja Mundhe) यांचे स्वागत केल्यानंतर मनोज देवानंद कायंदे (Manoj Kayande) यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात आपल्याकडे घड्याळ असल्यामुळे आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. यावेळी मनोज कायंदे यांनी पंकजाताई यांना हातातील घड्याळ दाखवले. त्यामुळे हेलिपॅडवरची ही भेट गरम राजकारणालाही गारवा देणारी ठरली. नंतर सिंदखेडराजाच्या सभेतून आपण कोणाच्याही विरोधात नसल्याचे पंकजाताईंनी स्पष्ट करुन, महायुतीचा कोणताही उमेदवार त्यांच्या बॅनरवर आपले छायाचित्र लावू शकतो.. असेही पंकजाताई म्हणाल्या. या भेटीने (Manoj Kayande) मनोज कायंदेंच्या चेहर्यावर हास्य फुलले!