कार्ली – बोरव्हा अर्धवट रस्ता कामामुळे घडत आहे अपघात
मानोरा (Manora Accident) : तालुक्याच्या सीमेवर असलेले बोरव्हा (Manora road) या गावातील नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून मंजूर रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे (Manora Accident) अपघाताच्या घटनेत रस्त्यावरून पडून जखमी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. बोरव्हा हे गाव वाशिम आणि यवतमाळ जिल्हा सीमेवर असून मानोरा दारव्हा रस्त्यावरील कार्ली ते बोरव्हा या जवळपास चार कि. मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी स्थानिक (Manora Panchayat) ग्राम पंचायतने दिवंगत आ. राजेंद्र पाटणी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कामाची मंजुरात मिळविली होती.
शासनमान्य चित्तरवार कंत्राटदार कंपनीकडून मागील चार महिन्यांपासून या रस्त्याची डागडुजी व मजबुतीकरणाचे काम कासवगतीने केले जात असल्याने व रस्त्यावर मोठ्या साईजची खडी पसरवून ठेवल्याने बोरव्हा या गावातील डझनभर पेक्षा अधिक नागरिक घसरून पडून जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. हेकेखोर कंत्राटदार कंपनीने निर्माणाधीन रस्त्यावर बांधकाम साहित्याचे ढिग प्रारंभी साठवून ठेवले आहे. या ढिगार्यांमुळे सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना बोरव्हा वासियांना यापूर्वी करावा लागत आहे. गत चार महिन्यापासून हा रस्ता दुरुस्ती व (Manora Accident) मजबुतीकरण केल्या जात असून आतापर्यंत केवळ एक कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण होऊन उर्वरित रस्त्यावर बांधकाम साहित्य पसरविलेले असल्याचे दिसत आहे.
या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना स्थानिक नागरिक तुळशीराम पवार घसरून खडीवर पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. त्याच अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आहे. भविष्यात नागरिकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी या (Manora Accident) रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेली खडी मार्गी लावून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.