Manora :- भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी युवा अक्षय विजय राठोड ( रामावत ) यांची निवड युवकांचे काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक यांनी मानोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर यांच्या शिफारसी वरून केली आहे
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक यांनी युवा अक्षय राठोड यांची नियुक्ती केली
आगामी जिल्हा परिषद(Zilla Parishad), पंचायत समितीच्या निवडणुकीत युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर यांच्या पाठपुरावामुळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक यांनी युवा अक्षय राठोड यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे ध्येय धोरणाशी बांधील राहून युवांचे संघटन उभारून पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस कार्य करणार, असे मत नवनियुक्त युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय राठोड यांनी दिली. आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाधक्ष सरनाईक, तालुकाध्यक्ष तरोडकर काँग्रेसचे पदाधिकारी यांना दिले आहे.