कारंजा(Washim) :- मानोरा हा विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाला सोडवून घेण्यात यावा. अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना निवेदन देऊन दिनांक २६ सप्टेंबर रोजी केली आहे.
कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडवून घ्यावा
अजित पवार अमरावती येथील कार्यक्रमासाठी आले असता पुंजानी यांनी बेलोरा विमानतळ (Airport)अमरावती येथे त्यांची भेट घेतली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला होता, त्याअनुषंगाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोषक असून यावेळी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, राकापा प्रदेश उपाध्यक्ष तथा वाशिम जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिप अध्यक्ष दिलीपराव जाधव व माजी जि.प सभापती जयकीसन राठोड यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असल्याने जिल्ह्यात पक्षाचे मजबूत संघटन तयार झालेले आहे, कारंजा-मानोरा मतदारसंघात जातीय समीकरण व जबाबदार सर्व पदाधिकारी एक निष्ठेने कार्य करीत असल्यामुळे पक्षाची बाजू भक्कम झालेली आहे, त्यामुळे कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडवून घ्यावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हाजी मो युसूफ पुंजानी यांचे सह राकापा अकोला जिल्हाध्यक्ष अंधारे,राकापा अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख,कारंजा शहराध्यक्ष अजय श्रीवास,डॉ अविष दरेकार,संजय राठोड, प्रवीण राठोड, मुजाहिद खान, सदीम नवाज, वहिद शेख आदी उपस्थित होते.