मुंबई येथे पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
मानोरा (Manora Assembly Elections) : माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके (Saitai Dahake) यांनी भाजपात तर आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात दोघांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई येथे आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश सोहळा पार पडल्याने मविआ व महायुतीचा कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा सुटणार आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या (Manora Assembly Elections) लोकसभा निवडणुकीत सईताई डहाके (Saitai Dahake) यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षात होत्या. तर ज्ञायक पाटणी हे भाजपा पक्षात होते. (Manora Assembly Elections) विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला सईताई डहाके यांनी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत न मिळाल्याने आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. तर आमदार पूत्र ज्ञायक पाटणी (Gyayak Patni) यांना भाजपाची उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत असतानाच एन वेळेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्याने त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बंडोबा करू शकतात खेळ खंडोबा
अजित पवार गटाच्या समर्थक असलेल्या सईताई डहाके(Saitai Dahake) यांचा वेळेवर भाजपात तर गेल्या दहा वर्षांपासून भाजपाचा झेंडा हातात घेऊन रात्रंदिवस पक्षासाठी काम करणारे आमदार स्व राजेंद्र पाटणी (Gyayak Patni) यांचे पुत्र यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केल्याने मतदार संघात मोठी उलथापालथ झाली असुन महायुती व महाविकास आघाडीची उमेदवारी माजी आमदार पत्नी व आमदार पुत्रांना मिळण्याची आशा धूसर झाली आहे. राजकीय पक्षाने निकटवर्तीय सोडून आयात उमेदवार मतदार संघात लादले तर बंडोबा खेळ खंडोबा करु शकतात, अश्या खमंग चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष पद सोडून युसुफ पुंजानी यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. मात्र वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी अभिजीत राठोड यांना जाहीर झाल्याने युसुफ पुंजानी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. यासह काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने देवानंद पवार, उबाठाने उमेदवारी नाकारल्याने अनिल राठोड, डॉ श्याम जाधव, डॉ महेश चव्हाण, सुनिल धाबेकर, डॉ वर्षा राठोड, मधुसूदन राठोड, नंदा गवळी आदीसह अनेक इच्छूक उमेदवार बंड पुकारून कार्यकर्ते व समर्थक यांच्याशी संपर्क साधून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.