मानोरा (Washim):- महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Laadki bahin yojna) २१०० रूपये हप्ता दिला जाईल, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी विधानसभा निवडणूकीत प्रचार सभेत दिले होते. आता त्यांचेच महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. तरीही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पूर्वीप्रमाणे १५०० रुपयाचा जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
बहिणीच्या खात्यात पूर्वीप्रमाणे १५०० रुपयाचा जमा होण्यास सुरूवात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यास १ जुलै पासून सुरूवात झाली. त्यावेळी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै होती. परंतु अर्ज अधिक येतील व लाडक्या बहिणी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ म्हणून ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख केली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून सप्टेंबर अखेर पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. अर्ज भरण्यासाठी मोठा कालावधी मिळाल्याने राज्यातील लाखो लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीची (assembly elections)आदर्श आचार संहिता लागू होण्यापूर्वीच या योजनेचा माहे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबर महीन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे महिलांना महायुती सरकार बद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २१०० रूपये देण्याचे आश्वासन पूर्ण न करता १५०० रूपये दिल्याने महीलात नाराजीचा सूर उमटत आहे.