मानोरा (Manora Crime) : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात खुलेआम अवैध धंदे सुरू असून (Manora Crime) ग्रामीण भागातील अनेक गावात खुलेआम राजरोसपणे अवैध वरली, मटका, जुगार व देशी विदेशी दारूची विक्री सुरू आहे. पालकमंत्री संजय राठोड व पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी अवैध धंद्याला आळा घालावा नागरिकांमधून होत आहे.
शहरासह तालुक्यातील शेंदूरजना आढाव, भोयणी ( फाटा ), कुपटा, दापुरा, गव्हा, आसोला खुर्द, कोलार, कार्ली, इंझोरी, रुई, साखरडोह, गिरोली, पोहरादेवी, शेंदुरजना, विठोली, सोयजना, पंचाळा, उमरी, धामणी , कारपा, सोयजना, हातोली , आमदरी, फुलउमरी आदी दुर्गम भागात या धंद्यांची पाळे घट्ट झाली असून या अवैध धंद्यापैकी अनेकांचे संसार उध्वस्त होऊन उघड्यावर पडले आहेत. याचा (Manora Crime) दुष्परिणाम युवकानवरही होत असून युवा पिढीही या मार्गात ओढल्या जात आहे.
दारू मटका जुवा च्या आहारी येथील युवकही जात असून याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत असून (Manora Crime) मानोरा तालुक्यात अवैध वाहतुकीला जणू मुभाज देण्याचा प्रकार विठोली, आमगव्हाण व वाटोद फाट्यावर खाकी वर्दी पठाणी वसुली करत खुलेआम वाहनांना आठवडी बाजाराच्या दिवशी हप्ते घेण्याचा प्रकार चालू असून याला सामान्य जनता वैतागली आहे. दारूचे तर ग्रामीण भागात पाट वाहत असून या दारू पायी संसाराची राख रांगोळी होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष देऊन बेकायदा धंदे बंद करावे. अशी मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे.