मानोरा (Manora death) : तालुक्यातील कार्ली येथील मूळ रहिवासी व बोरव्हा शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या तुळशीराम ठाकरे यांची १६ वर्षीय मुलगी हिचा २३ ऑगस्ट रोजी शेत नजिक खचलेल्या विहीरीत मृतदेह (Manora death) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घरासमोर असलेल्या शेतातपिडीत मुलगी २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास भाजीपाला आणावयास गेली होती. ती बेपत्ता झाल्यावर वडिलांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास मुलीचा मृतदेह शेत नाजिक असलेल्या विहीरीत तरंगताना आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून त्या मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. व उत्तरीय तपासणी साठी रुग्णालयात पाठविला. या (Manora death) प्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असुन अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.