कोविड काळात सामाजिक संस्थेने केले होते सन्मानीत
मानोरा (Manora Doctor) : आजच्या युगात मोफत सेवा देणारे फार कमी डॉक्टर आहेत. त्यातही अपवाद एखादी व्यक्ती कोणतेही सामाजीक कार्य केल्यास सोशल मिडियावर फोटोचा भाडीमार होतो. पण याला अपवाद म्हणून (Manora Taluka) मानोरा तालूक्यातील एका डॉक्टरने कुठेही प्रसिध्दी करता , गेल्या १५ वर्षापासुन माजी सैनिक, सैनीक अंपग, निराधार यांची मोफत सेवा करीत आहे.
त्या अवलीया डॉक्टरने कोविड काळात चांगली (manora Hospital) वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल जिल्हा ठिकाणी वाशिम येथील एका सामाजिक संस्थेने सुध्दा सन्मानीत केले असल्याचे समजते, तसेच मानोरा तालूक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे गरिब गरजू विद्यार्थी यांना पाठ्यपुस्तक, वही, पेन, शालेय उपयोगी साहीत्य जिल्हा परीषद शिक्षकामार्फत पुरवतो व कुठेही नावाचा उल्लेख होवू न देता आजपर्यंत सामाजिक सेवा सुरु आहे. आमच्या प्रतिनिधीने त्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता डॉक्टरने बातमी देण्यास व प्रसीध्दी करण्यास विरोध केला. आणि पुढेही अशीच सेवा अविरत सुरु ठेवणार, असे सांगत माझ्या नावाचा कुठेही उल्लेख न व्हावा अशी विनंती केली.
आज वैद्यकीय क्षेत्र म्हटल्यावर कमाईचे साधन समजले जाते. शहरातील डॉक्टरकडे (Manora Doctor) पाठविण्यात येणार पेशंटचे डॉक्टरकडून कमिशन घेतात. तसेच औषधी कंपनीकडुन मिळणारे टक्केवारीची सुध्दा कमाई करतात.