राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला फासले हरताळ
मानोरा (Manora Hospital) : शहरातील ग्रामीण शासकीय ग्रामीण रुग्णालयातील (Manora Hospital) रुग्णालय प्रशासनावरील आरोग्य सेवेचा भार कमी व्हावा आणि शहरातील नागरिकांना माफक दरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कुलूप बंद झाल्याने शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांची कुचंबना होत आहे.
शहरातील वसंत नगर भागात उभारण्यात आलेला राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्पातील एक आपला दवाखाना (Manora Hospital) मागील काही महिणन्यापासून कुलूप लावून बंद अवस्थेत आहे . या भागातील नागरिकांना या दवाखान्याचा उपयोग काय असा सवाल टाळे लावण्यात आलेल्या इमारतीचा दवाखाना असलेल्या आपला दवाखान्यावरून नागरिकांमध्ये चर्चील्या जात आहे.
गतवर्षी सुरू करण्यात आलेला हा दवाखाना (Manora Hospital) येथे आवश्यक असलेल्या एकूण कर्मचारी संख्येच्या अर्ध्या संख्येवर कसाबसा चालू होता व स्थानिक नागरिक आपला दवाखान्याचा उपयोग उपचारासाठी करून घेत होते, मात्र आता दवाखाना पूर्णपणे कुलूप लावून बंद करण्यात आल्याने गरजू नागरिकांना शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याशिवाय सध्या तरी पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या आपला दवाखान्यात (Manora Hospital) विविध आजारावर मोफत उपचार करण्यात येत होते. रक्त चाचण्या व मोफत औषधी सुध्दा मिळत होती. परंतू अचानक दवाखाना बंद झाल्याने शहरातील गोर गरीब रुग्णांची पंचाईत झाली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी यांनी लक्ष केंद्रीत करून कुलूपबंद दवाखाना सुरू करण्याची मागणी गोर गरीब रुग्णांकडून होत आहे.