मानोरा (Washim) :- मानोरा तालुक्यातील सोमनाथनगर येथील सत्संगाच्या बाजूला असलेली टेकडीचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती विभागीय गस्तच्या दरम्यान मानोरा पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता दिनांक १३ फेब्रुवारीला सकाळी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान पाच ट्रॅक्टर एक जेसीबी ताब्यात घेऊन मानोरा पोलीस स्टेशन जमा करण्यात आले.
पाच ट्रॅक्टर एक जेसीबी ताब्यात घेऊन मानोरा पोलीस स्टेशन जमा
पोलीस सूत्राकडून दिलेल्या माहिती नुसार दिनांक १३फेब्रुवारी रोजी विभागीय ग्रस्त असताना तालुक्यातील सोमनाथ नगर येथील सत्संगाच्या बाजूला टेकडीचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांना मिळताच तेथे क्षणात हजर झाले. एक जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर च्या साहाय्याने अवैध मुरमाचा उपसा चोरी करून नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाच ट्रॅक्टर आणि एक जेसीबी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनाला जमा करण्यात आले. आणि अवैध गौण खनिज (Illegal minor minerals) संदर्भात पुढील कारवाई करिता मानोरा तहसीलदार यांचेकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यांचेवर काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित बारे, सपोउपनिरीक्षक रवींद्र राजगुरे, पोशी रोहन तायडे, राहुल जयसिंगकार, फिरोज शेख, करण ढंगारे यांनी केली आहे.