मानोरा (Washim) :- भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने पोहरादेवी मंडळाच्या नवीन मंडळ अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया संदर्भात दि. १३ एप्रिल रोजी भक्तीधाम वसंतनगर पोहरादेवी येथे बैठक पार पडली. यावेळी भाजपाच्या पाच इच्छूक उमेदवारांनी निवडणूक (Elections) प्रक्रियेत आपले नाव नोंदवून सहभाग घेतला होता.
भाजपाच्या पाच इच्छूक उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत आपले नाव नोंदवून सहभाग घेतला
सदर निवडणूक प्रक्रिया महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत भक्तराज महाराज व मंडळ निवडणूक अधिकारी वसंतराव धाडवे व धनंजय भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडली. पोहरादेवी, फुलउमरी, शेंदुरजना आढाव व आसोला खुर्द या चार जिल्हा परिषद सर्कलच्या मंडळ अध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवार वसंतनगर पोहरादेवीचे लोकनियुक्त सरपंच तथा भाजपाचे पदाधिकारी गणेश पुरुषोत्तम जाधव, भाजपाचे पदाधिकारी विकल पवार, महेंद्र राठोड, सचिन राठोड, स्वप्निल पाटील आदींनी आपले नाव सादर केले होते. या निवडणूक प्रक्रिया बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख व सर्व आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.