मानोरा (Manora murder case) : संपत्तीच्या कारणाने आपल्या सख्या आजी आजोबा यांची हत्या नातवाने आपल्या तीन मित्राच्या मदतीने केल्याची घटना दि.४ ऑगस्ट रोजी मानोऱ्यात घडली होती. (Manora murder case) याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी येथील न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने १४ ऑगस्ट पर्यंत (Manora Police) पोलीस कोठडीत वाढ दिली आहे.
दिनांक ६ ऑगस्ट रोजी इंझोरी येथील अडाण नदी पात्रात एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता..दि. ७ ऑगस्ट रोजी मृतदेहाची ओळख पटली.प्रल्हाद विर रा.सोमठाना यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास केला असता हे प्रकरण हत्या असल्याचे आढळून आले. दि.८ ऑगस्ट रोजी निर्मला विर यांचा मृतदेह आढळला. मृतक प्रल्हाद विर व निर्मला वीर यांचा नातू प्रतीक संतोष विर,वा तीन मित्र यांना दि.७ ऑगस्ट रोजी अटक केली. दुहेरी हत्याकांड प्रकरणी चार जणा विरूद्ध पोलिसांनी (manora Crime) गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना (Manora Police) पोलिस कोठडीची मागणी केली असता दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दिनांक १२ ऑगस्ट रोजी अरोपिंना न्यायालया समोर हजर केले असता १४ ऑगस्ट पर्यंत पी.सी.आर वाढवून देण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे करीत आहेत.
आरोपी कडून मुद्देमाल व हत्यार हस्तगत
प्रल्हाद वीर यांना मारण्यासाठी वापरलेले हत्यार, ६ पिवळ्या धातूच्या बांगळ्या,एक काळ्या मण्याची ओळलेली ६७ पिवळ्या धातूच्या मण्याची पोत, चांदीच्या २ पाट्या, सोन्याची १ पोत, २ सोन्याच्या अंगठ्या व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल ( एम. एच. ३७ ए ई. ७६७९ स्प्लेंडर गाडी ) हस्तगत करण्यात आली.




