मानोरा(Manora):- तालुक्यातील मौजे वाईगौळ येथे माझ्या घरासमोर काही व्यक्तीने मालकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारची परवानगी नसतांना बॅनर (Banner)लावून पक्के बांधकाम केले असुन याबाबत न्याय न मिळाल्याने मंगळवार दि. १८ जून पासून तहसिल कार्यालय प्रांगणात कुटुंबासह सौ दुर्गा श्याम फाले यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील गुंड प्रवृत्तीच्या काही जणांनी माझ्या मालकीच्या जागेवर परवानगी न घेता पक्के बांधकाम (construction) करून गैर कायदेशीररीत्या बॅनर लावले आहे. बॅनर लावले बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता आम्हा गरीब आदिवासी(tribal) कुटुंबाला जिवे मारण्याची व गाव सोडण्याची धमकी देवून घरावर गोटमार केली. त्यामुळे आमचे जीवन जगणे कठीण झाले असुन आमच्या घरासमोरील केलेले बांधकाम हटवून न्याय द्यावा, या मागणीसाठी फाले कुटूंब आमरण उपोषणाला बसले आहेत.