मानोरा (Manora Panchayat Samiti) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे भुली येथील ग्रामपंचायतमध्ये (Bhuli Gram Panchayat) सचिव व सरपंच यांनी १४ वा आणि १५ वित्त आयोगातील काही व इतर कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची उचल करत कामेही रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. सदरील केलेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी तसेच उपोषण कर्ता ग्राम रोजगार सेवक प्रकाश चव्हाण यांना कामावरून कमी केल्याप्रकरणी दि. ५ ऑगस्ट पासून पंचायत समिती आवारात (Fasting to death) उपोषणकरत्यानी बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. चवथ्याही दिवशी न्याय न मिळाल्याने उपोषण सुरूच आहे.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे (Bhuli Gram Panchayat) भुली ग्राम पंचायतचे सचिव व सरपंच यांनी भूमिगत गटार कामाचे जवळपास ३१ लक्ष खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र गावात कोठेही भूमिगत गटार बांधलेले नाही. पेवर ब्लॉक बसविण्याचे कामात भ्रष्टाचार केला असुन कोमल राठोड ते दिनेश चव्हाण यांच्या घरापर्यंत ३ लक्ष रूपये शासनाचा निधी घेतला असुन काम मात्र केलेला नाही. यासह शौचालय व मुत्रिघर, पाणी पुरवठा अंतर्गत हातपंप बांधकाम व पेव्हड ब्लॉक, जिल्हा परीषद शाळेचे फर्निचर, सोलर अभ्यासिका, सोलर लायब्ररी, पाणी पुरवठा दुरुस्ती, गाव अंतर्गत रस्ता, आरोग्य कोरोना शिबिर, अंगणवाडी दुरुस्ती व गॅस सिलेंडर, जिल्हा परीषद शाळा रंगरंगोटी, जिल्हा परीषद शाळेचे वॉल कंपाऊंड, अंगणवाडी खेळणी व आवश्यक साहित्य खरेदी, महीला व पुरुषावर प्रशिक्षण खर्च, सोलर पथदिवे, जिल्हा परीषद शाळा डिजिटल खर्च, ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती व रंगरंगोटी, दलीत वस्ती पाणी पुरवठा व पाइप लाईन दुरुस्ती, कचरा कुंडी, सिमेंट बाकडे खरेदी, सिमेंट काँक्रिट रस्ता यासह अनेक बाबीवर खर्च दाखवून लाखो रुपयांचा खर्च करून सचिव, सरपंच यांनी संगनमतीने भ्रष्ट्राचार केलेला आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेत गावात पक्षपात करण्यात आला असून गरजू गरीब, भूमिहीन व शेतमजुर नागरीकांना डावलून आपल्या मर्जीतील पक्के घर असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. उपोषण मंडपाला काँग्रेसचे जिल्हा प्रभारी देवानंद पवार, राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ श्याम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी प. स. सभापती भोजराज चव्हाण, माजी समाज कल्याण सभापती जयकिसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष पंडीत जाधव, तालुकाध्यक्ष काशीराम राठोड, गट विकास अधिकारी पिल्लेवाड, माजी प. स. सदस्य जय प्रकाश आडे आदीसह इतरांनी भेट दिली आहे.
मी रोजगार सेवक असताना माझ्याविरुद्ध खोटी तक्रार करून कामावरून कमी केले आहे. सदरील तक्रार रद्द करण्यात यावी व १४ व १५ वित्त आयोगाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, आदी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच ठेवणार, अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता (Fasting to death) उपोषण कर्ता प्रकाश चव्हाण यांनी दिली.