प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक महिन्यांपासून वाहत आहे रस्त्यावरून घाण पाणी
मानोरा (Manora Panchayat Samiti) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे हट्टी या गावाच्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारी नाली नसल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून ओसंडून वाहत असुन यामुळे गावातील नागरिकांचे श्वास दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. (Manora Panchayat Samiti) ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद प्रशासन (Zilla Parishad) याकडे करीत असलेल्या डोळे झाकमुळे येथे एखादी सार्वजनिक साथरोग पसरल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल या निमित्ताने ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
गट ग्रामपंचायत वापटा मध्ये हट्टी या गावाचा समावेश होतो. हट्टी गावामध्ये जवळपास ९०० लोकांची वस्ती असून या गावातील लोकांच्या मूलभूत प्राथमिक सोयीकडे स्थानिक ग्रा. पं. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे हट्टी गावातील रस्त्यावरून ओसंडून वाहत असलेल्या घाण पाण्यावरून दिसून येत आहे. अंतर्गत रस्त्यावरील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात ग्रापं, (Manora Panchayat Samiti) पं. स. प्रशासनाच्या निदर्शनास मागील अनेक महिन्यांपासून ही बाब आणून दिल्यानंतरही प्रशासनाकडून यावर कुठलीही उपाय योजना केल्या जात नाही.
आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हट्टीतील रस्त्यावरील घाण पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासंदर्भात ग्रापं, (Manora Panchayat Samiti) पं.स. समिती कार्यालय पर्यंत पाठपुरावा केला आहे. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेणे आता गरजेचे झाले आहे.