तीन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
मानोरा (Manora Police Station) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोहरादेवी बिट मधील गोंडेगाव येथे मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी तीन ठिकाणी गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून लाखो रुपयाचा मुद्दे माल जप्त केला. (Manora Police) पोलिसाकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी अशोक देविसिंग पवार ( वय ६५ ) यांच्या घरी पोलीसांनी प्रो रेड करुन ६० लिटर गावठी हात भट्टी दारु ६००० रूपये व ६०० लिटर सडवा मोहामाच किंमत ९० हजार रुपये , ५० गूळ २०००, तुट्टी ५० किलो २००० व दारु काढण्याचे इतर साहित्य ५००० हजार असा एकूण १ लाख ५० हजार रुपयाचा चा प्रो माल पोलीसांनी जप्त केला.
आरोपी झुंबरबाई प्रल्हाद पवार यांच्या घरातून ६० लिटर गावठी हात भट्टी दारु ६००० हजार, ६०० लिटर सडवा मोहमाच किंमत ९० हजार इतर साहित्य ५००० व एकुण १ लक्ष १ हजार रुपयाचा प्रो माल , आरोपी रुख्मीबाई सुभाष राठोड हिचे घरातून ३० लिटर गावठी हातभट्टी दारु, किंमत ३००० हजार, सडवा मोहमाच २०० लिटर किंमत ३० हजार व इतर साहित्य ५००० असा एकूण ३८ हजार रुपयाचा प्रो माल असे एकूण तिन्हीही आरोपीकडून २ लाख ४४ हजार रुपयाचा हात भट्टी दारु व साहित्य पोलीसांनी पंचा समक्ष जप्त करून यांचे विरूद्ध कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई (Manora Police) पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजय अजमीरे, अभिजीत बारे, डी बी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन पुणेवार, स. फौ. रविन्द्र राजगुरे, दिपक राठोड, पोशी मनिष अगलदरे, रोहन तायडे , शंकर राख, करण ढंगारे यांनी केली.