दहा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
मानोरा (Manora Police Station) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे वाईगौळ ते गादेगाव रस्त्यावर असलेल्या शेतातील टिन शेड मध्ये सुरू बेकायदा जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक वाशीम च्या पथकाने दि. २५ ऑक्टोंबर रोजी पहाटे तीन वाजता च्या सुमारास धाड टाकली असता ९० लाख ७३ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल (Manora Police Station) पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीसांनी दहा आरोपी विरुध्द जुगार ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार (Manora Police Station) पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या आदेशावरून व मिळालेल्या माहितीवरून वाईगौळ ते गादेगाव रस्त्यावरील शेतातील लोखंडी टिन शेड येथे पोलीसांनी धाड टाकली असता शेडमध्ये काही इसम एकत्र बसून पत्ते खेळताना दिसून आले. पोलीसानी जवळ जाऊन इसमाना पकडण्याचा प्रयत्न केला असता काही जण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पसार झाले. घटनास्थळी तास, पत्ता जुगार खेळणाऱ्या ( अंदर बाहेर एक्का बादशाह ) खेळणाऱ्या आरोपी किरण भगवानराव दुधाने ( वय ३५ ) राहणार पुसद, फैजान शेख कयुम शेख ( वय २२ ) राहणार दिग्रस , इम्रान शेख जमील शाह ( वय ३४ ) मानोरा, संजय परशराम राठोड ( वय ४२ ) राहणार वानी ता. दारव्हा , रोहन श्रीकांत जयस्वाल ( वय २९ ) राहणार गांधी नगर आर्णी, अनुप विलास ठाकरे ( वय २० ) राहणार संभाजी नगर आर्णी, प्रथमेश राजेश मुदगले ( वय २४ ) बंजारा कॉलनी पुसद व जुगार भरविणारे आरोपी रोहन श्रीकांत जयस्वाल ( वय २९ ) राहणार आर्णी, मनोज अशोक राठोड, अक्षय राठोड राहणार वाईगौळ, फैजाण निसार शेख राहणार दिग्रस यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
या कारवाईत (Manora Police Station) पोलीसांनी रोख ६८ हजार ३९० रूपये, ९ चार चाकी वाहन आणि ६ मोटर सायकल किंमत ८६ लाख ५० हजार रुपये, अधिक १० मोबाईल किंमत ३ लाख ५५ हजार रुपये असा एकूण ९० लाख ७३ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. आरोपीविरुद्ध पोलीसांनी कलम ४ , ५ म. जु. का. अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उप अधिक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक, रामकृष्ण भाकडे, पोलीस शिपाई स्वप्निल तुळजापूरे, आर सी पि पथक प्रमुख विजय इंगोले,पोलीस कॉन्स्टेबल भिमराव गवई, नईम शेख, महादेव ठाकरे, चंदन राठोड, अमित वानखडे, मोहन खिल्लारे, साहेबराव पट्टेबहाद्दूर, प्रमोद नंदेवार, दिपक चव्हाण आदींनी कारवाई केली.