मानोरा (Manora) :- तालुक्यातील कोंडोली बिट हद्दीत ग्राम पंचायत निवडणूक व यात्रा संबंधाने पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम कोंडोली येथे दोन ठिकाणी पोलिसांनी गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून ४४,५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
पोलिसांनी गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून ४४,५०० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी प्रल्हाद मारोती पवार यांच्या घराची झडती घेतली असता प्रल्हाद मारोती पवार याचे घराची झडती घेतली असता २३,५०० रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त केला. तसेच प्रतिभा राहूल आमटे हिच्या घराची झडती घेतली असता २१,००० हजार रुपयांचा दारूसह मुद्देमाल आढळून आला. अवैद्यरित्या गावठी दारू (alcohol) सह मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून पोलिसांनी वरील दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डि बी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक अभिजीत बारे, पोलीस कर्मचारी मदन पुणेवार, फिरोज भुरीवाले, मनिष अगलदरे, शितल कराळे, महिला होमगार्ड नैना पवार यांनी केली.