मानोरा (Manora Raid) : तालुक्यातील गव्हा बिट हद्दीत पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम गव्हा येथील मनोज बाबुसिंग राठोड यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, (Manora Raid) असता गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून २५, ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी मनोज बाबुसिंग राठोड यांच्या (Manora Raid) घराची झडती घेतली. २५ लिटर हात भट्टीची दारू किंमत २५०० रुपये १८० लीटर सडवा मोहमाच किंमत १८,००० रुपये व दारू गाळण्याचे साहित्य किंमत ५,००० असा एकूण २५,५०० रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त केला.
अवैद्यरित्या गावठी दारू (Manora Raid) सह मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष पोलिसांनी जप्त करून वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डि बी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन पुणेकर, रवी राजगुरे, पोलीस कर्मचारी मनीष अगलदरे, रोहन तायडे, शर्विनी पखाले, विजय राठोड यांनी केली.