हिवाटीचा पांदण रस्ता फसला चिखलात
मानोरा (Manora Road) : तालुक्यातील गव्हा ते आसोला शेत शिवारात जा-ये करण्याचा वहीवाटीचा पांदण रस्ता चिखलात फसल्याने शेतात जातांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती केंव्हा होणार, अश्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. गव्हा शेत शिवारातशेती असलेल्या आसोला खुर्द येथील शेतकऱ्यांना वहीवाटीसाठी शेतात जाण्यासाठी जुना पांदण रस्ता हाच एकमेव मार्ग आहे.
शेतकरी वैतागले, रस्ता दुरुस्तीची मागणी
पावसाळ्यात या चिखल साचलेला आहे. या (Manora Road) चिखलात पाय फसत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. या रस्त्याने शेतात जाणे जिकरीचे होत आहे. तरीपण दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. चिखल तुडवत आणखी किती दिवस शेतात जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
पांदण रस्त्याचा प्रश्न रखडला
पावसाळ्यात (Manora Road) रस्त्यावर चिखल साचल्याने चार ते पाच महिने वहीवाटीचा बंदच असतो. शेतकरी चिखल तुडवत शेतात जातात. शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या समस्याकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी मार्गी लावण्याची मागणी शेतकरी पुष्पराज राठोड यांच्या सह इतरांनी केली आहे.