मानोरा (Sachin Godmale PSI Selection) : तालूक्यातील खेडेगाव असलेल्या तळप बु. येथील शेतकरी कुटुंबातील संजय गोदमले यांचा मुलगा चिरंजीव (Sachin Godmale) सचिन गोदमले यांची पि एस आय पदी निवड (PSI Selection) झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचा आदिवासी आफ्रोट संघटनेचे पदाधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष बंडू वाघमारे, माजी जि. प. सदस्य चिंतामण खुळे, मारोती पारधी, गजानन मोरकर, महादेव वाघमारे, सुभाष मोरकर, संतोष खापरकर, तसेच सुभाष पवने, भारत बेलखेडे, सुरेश भगत, खुशाल इंगळे, गजानन इळे, सुभाष देवकर उपस्थित होते.
या प्रसंगी (PSI Selection) पि एस आय सचिन (Sachin Godmale) याला त्याच्या नियूक्तीसाठी झालेल्या प्रयत्नाबाबत विचारना करण्यात आली. गेली अनेक वर्षापासून आमच्या घराण्यात वडीलोपार्जीत पंजोबा पासून शेती करूनच अवलंबून उदरनिर्वाह केले आहे. त्यामूळे माझ्या आईवडीलांची ईच्छा होती की, आपल्या सर्व पिढ्याचे आयुष्य काय शेत करण्यातच जाणार की, काय कुणीतरी आपल्या घरातून चांगल शिक्षण घेवून मोठा अधिकारी बनून गोदमले घराण्याचे नाव उज्वल करावे. वडीलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी मी मनाची मोठी तयारी केली. वास्तविक पाहता मला शिक्षणात फारसा रस वाटत नव्हता. परंतू आईवडीलांच्या ईच्छापूर्ती साठी काहीही करून त्यांच्या ईच्छा पूर्ण करणार अशी तयारी करून घराला विसरून बाहेरगावी शिक्षणासाठी पडलो आणि स्पर्धा परिक्षेत उतरलो एक – दोन वेळा अपयशही आले तरीही सुद्धा अपयशाने खचून न जाता पून्हा जोमाने अभ्यासाला लागून परिक्षा क्रॅक केली आणि आईवडीलांची ईच्छा पूर्ण केली.
मनाची आकांक्षा वाढवून तयारीला लागा
पुढे समाजातील विद्यार्थ्यांना काय संदेश देणार ? विचारले असता मनाची तयारी असेल तर मित्रांनो मोठ्यात मोठे काम पार करून जाण्याची हिम्मत येते. कठिणातले कठिण काम सुद्धा सोपे होऊ शकते. म्हणून मनाची आकांक्षा वाढवून तयारीला लागा आणि आईवडीलांची व तुमची सुद्धा स्वप्ने पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थी व (PSI Selection) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांना केले.