मानोरा (Washim) :- बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत समाजबांधव व अधिकारी यांचा सन्मान सेवारत्न पुरस्काराने ना. संजय राठोड, ना. इंद्रनील नाईक यांनी धर्मगुरु, महंत मंडळी व व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केला.
ना. संजय राठोड, ना. इंद्रनील नाईक यांनी धर्मगुरु, महंत मंडळी यांची प्रमुख उपस्थितीत
यावेळी राजकीय क्षेत्रात समाजासाठी अहोरात्र झटणारे माजी खा. तथा आ. हरिभाऊ राठोड, संत सेवालाल महाराज यांच्या जीवन पटलावर चित्रपट काढणारे कलावंत सी. के पवार, उद्योग क्षेत्रात भरारी घेणारे अभियंता अशोक राठोड, बंजारा कवी तुकाराम महाराज, प्रयोगशील शेतकरी डॉ सिताराम जाधव, साहित्यिक प्राचार्य राजाराम राठोड, कवी मागीलाल राठोड, बंजारा लेंगी नृत्य पुढारी श्याम जाधव , वैद्यकीय क्षेत्रात कामगिरी बजावणारी डॉ स्मिता चव्हाण, व्यसन मुक्तीवर काम करणाऱ्या जिजाबाई राठोड, बंजारा गीत शाहीर दौलत राठोड अश्या अकरा मान्यवराचा तर तीर्थक्षेत्र विकास कामात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अधिकारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधिक्षक अनुज तारे, उपवन संरक्षक अभिजीत वायकोस, मुख्य अभियंता गिरीष जोशी, अधिक्षक अभियंता अविनाश धोंगडे, हेमंत पाटील, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपविभागीय अभियंता अनंत खोडे, सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम राठोड, सहाय्यक अभियंता एस एफ चव्हाण आदींचा सहभाग होता.