मानोरा तालुक्यातील माहुली घटना!
मानोरा (Manora Taluka Crime) : तालुक्यातील माहुली येथे बौद्ध धर्माचे (भंतेजी) यांच्या वेशभूषेवरून आक्षेपार्ह वक्तव्य करत फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मानोरा पोलिसांनी फिर्यादी बाळू श्रीराम पांडे वय ४५ राहणार माहुली यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी बाळू पांडे हे २३ जानेवारी रोजी गावातील बौद्ध विहाराजवळ उभे होते. यावेळी तीन बौद्ध भंतेजी भिक्षा मागण्यासाठी आले असता, आरोपी सत्यपाल गोविंद राठोड याने भंतेजींच्या वेशभूषेवर आक्षेप घेत अपमानास्पद शब्द वापरले. फिर्यादीने ‘ते आमच्या धर्माचे भंतेजी आहेत, त्यांना असे का बोलतो?’ असे विचारले असता, (Manora Taluka Crime) आरोपीने त्यांचा जातीवरून अपमान करून “तुमची गावात राहण्याची औकात नाही,” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.
यावेळी (Manora Taluka Crime) दोघांमध्ये वाद सुरू असताना आरोपीचा भाऊ एकनाथ गोविंद राठोड, काका गोपाल दयाराम राठोड व चुलत काका मिलिंद जनार्धन राठोड हे त्या ठिकाणी आले. फिर्यादी हनुमान मंदिराच्या पारावर बसलेले असताना, “तू महार जातीचा असून पारावर कसा काय बसला?” असे म्हणून एकनाथ राठोड याने अपमानित केले. तर गोपाल राठोड याने पुन्हा पारावर बसल्यास ‘मारून टाकण्याची’ धमकी दिली. आरोपी मिलिंद राठोड याने “आमच्या सेवालाल मंदिराकडे आल्यास तुझे मुंडन करून गाढवावरून मिरवणूक काढू,” अशी धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी सत्यपाल गोविंद राठोड, एकनाथ गोविंद राठोड, गोपाल दयाराम राठोड आणि मिलिंद जनार्धन राठोड या चार आरोपीविरुद्ध कलम 351 (2) (3), 3(5) बि.एन. एस. सहकलम 3 (1) (r), 3(1)(s), 3(2) (va) अ.जा.अ.ज.प्रतिबंधक अधिनियम तसेच अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायदा अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Manora Taluka Crime) घटनेचा पुढील तपास कारंजा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी हे करीत आहे.




