मानोरा (Manora):- स्टार प्रकल्प व समर्ग शिक्षणअंतर्गत शालेय शिक्षण वर्ग १ ली ते १२ वी स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होण्यासाठी मानोरा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी (Higher Secondary Education)सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आयोजन मानोरा येथे तालुका स्तरावर करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षकांचे सक्षमीकरण होण्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण शिवाजी नगर येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) उच्च प्राथमिक शाळेत येथे १५ फेब्रुवारी पर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. ज्ञान आणि कौशल्ये शिक्षकांना आत्मसात व्हावी आणि विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे, हा यामागचा उद्देश आहे. या प्रक्रियेत भावी पिढी घडविण्यासाठी प्रशिक्षण मन लावून पूर्ण करावे, असा आशावाद गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी व्यक्त केला. एकूण १६५ शिक्षकांचे प्रशिक्षण तज्ञ राहुल प्रसाद तळेगावकर व रामेश्वर बेहरे यांनी यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सुलभकाचे कार्य करण्याकरिता नऊ सुलभक हे सहकार्य करीत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण दरम्यान शिक्षक यांना एक वेळचे जेवण व दोन वेळा चहा दिला जात आहे.