मानोरा (Manora) : महायुती (Grand Alliance) सरकारला बहुमताने सत्तेत बसविण्यासाठी सिंहासा वाटा असलेल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेल्या 2100 रुपयाच्या आश्वासनापेक्षा सध्या निकषांचीच मोठी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महिलांना सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने जुलै मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Chief Minister’s Beloved Sister Scheme) सुरू केली. यासाठी संपूर्ण राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला जाचक अटीचा सामना केला. ही बाब प्रसिध्दी माध्यमांनी सरकारच्या निदर्शनास आणून देताच सरकारने लाडक्या बहिणीच्या कागदपत्रात काहीशी शिथिलता आणली. या कागदपत्रांच्या जुळवाजुळवी साठी बँक (Talathi Office), सेतू सुविधा केंद्र, शाळा, तलाठी कार्यालय अश्या काही ठिकाणी तुफान गर्दी करून कागदपत्राची पूर्तता केली. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 1500 रूपये प्रति माहे प्रमाणे खात्यात जमा करणे सुरू केले.
महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत आले
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू होण्याच्या पुर्वी डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला. त्यावेळी सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकताना कुठलेही निकष लावले नाही. नोंदणी झालेल्या प्रत्येक अर्जासाठी लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम जमा होत गेली. या लाडक्या बहिणीना राज्य सरकार अतिशय लाडके होवून बसले असतानाच, विधानसभा निवडणूकीत या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता 2100 रूपये देण्याचे आश्वासन देताच लाडक्या बहिणी आनंदीत होवून आपल्या मताचा जोगवा महायुतीकडे वळविला. आणि महायुतीचे आमदार (MLA) अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक जागेवर विजयी होऊन महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत आले. राज्य सरकारच्या या लाडक्या बहिणींना आश्वासना प्रमाणे सहावा हप्ता 2100 रूपये मिळेल अशी अपेक्षा असताना 1500 रूपये खात्यात जमा झाले आहेत.
लाडक्या बहिणी मिळत असलेल्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार की काय?
आर्थिक तिजोरीवर ताण पडत असल्याचे पाहून राज्य सरकार (State Govt) निकषांचे हत्यार उपसनार असल्याची वार्ता कानावर येताच अनेक लाडक्या बहिणी मिळत असलेल्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार की काय? याची मोठी धास्ती लाडक्या बहिणीना लागली असुन या लाडक्या बहिणींना आता 2100 रूपयापेक्षा निकष मुळे बाद होणार नाही ना? याचीच अधिक काळजी लागलेली आहे.