ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर

‘माझ्यासाठी रडू नका...’ नाना पाटेकरांची शेवटची​​​​​​​ इच्छा

Veteran actor Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर निधन

‘माझ्यासाठी रडू नका...’ नाना पाटेकरांची शेवटची​​​​​​​ इच्छा

Veteran actor Nana Patekar

अंत्यसंस्काराबाबत आधीच व्यक्त केल्या होत्या 'या' तीन गोष्टी

पुणे/ मुंबई (Veteran actor Nana Patekar) : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 75 वर्षीय नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर निधन झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचे स्पष्टवक्तेपण, साधी जीवनशैली आणि विविध मुलाखतींमधील वक्तव्यांचीही चर्चा होत आहे. त्यापैकी मृत्यू आणि स्वतःच्या अंत्यसंस्काराबाबत त्यांनी पूर्वी केलेले भाष्य सध्या विशेष चर्चेत आले आहे.

‘माझ्यावर साधेपणाने अंत्यसंस्कार करा’

एका जुन्या मुलाखतीत नाना पाटेकर (Veteran actor Nana Patekar) यांनी मृत्यूकडे अत्यंत सहज आणि तटस्थपणे पाहत असल्याचे सांगितले होते. प्रसिद्धीचा झगमगाट किंवा दिखाऊपणा त्यांना फारसा पसंत नव्हता. आपल्या मृत्यूनंतरही कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दिखावा करू नये, अशी त्यांची भूमिका होती. याच संभाषणात त्यांनी स्वतःच्या अंत्यसंस्काराची तयारी आणि त्याबाबतच्या इच्छांबद्दलही भाष्य केले होते.

पहिली इच्छा: ओल्या लाकडावर अंत्यसंस्कार नको

नाना पाटेकर (Veteran actor Nana Patekar) यांनी स्वतःसाठी 12 मण लाकूड तयार ठेवले असल्याचे त्या मुलाखतीत सांगितले होते. मृत्यूनंतर त्याच लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार करावेत, अशी त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे, अंत्यसंस्कारासाठी ओले लाकूड वापरू नये, असेही त्यांनी म्हटले होते. ओल्या लाकडामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी येते; त्यामुळे अशा पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दुसरी इच्छा: माझ्यासाठी कोणीही रडू नये

नाना पाटेकर (Veteran actor Nana Patekar) यांनी मृत्यूनंतरच्या शोकाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या निधनानंतर कोणीही रडू नये, अशी त्यांची इच्छा होती. मृत्यू हा जीवनाचा एक भाग असून त्यासाठी अनावश्यक दुःख व्यक्त करण्यापेक्षा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असा त्यांच्या वक्तव्याचा सूर होता.

तिसरी इच्छा: फोटोला हार घालू नका

नाना पाटेकर (Veteran actor Nana Patekar) यांनी आपल्या अंत्यसंस्काराबाबत आणखी एक महत्त्वाची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर आपल्या छायाचित्राला हार घालू नये, असे त्यांनी म्हटले होते. आपल्या कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण यांचे निधन झाले असून आपणही एक दिवस त्यांच्याकडे जाणार असल्याचे त्यांनी त्या वेळी सांगितले होते. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्याऐवजी ही एक नैसर्गिक जीवनप्रक्रिया म्हणून स्वीकारावी, अशी त्यांची भावना होती.

निधनानंतर जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत

नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे हे जुने वक्तव्य सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चेत आले आहे. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर (Veteran actor Nana Patekar) यांनी वैयक्तिक आयुष्यातही मृत्यूकडे अत्यंत साधेपणाने पाहिले होते, हे त्यांच्या या वक्तव्यांतून दिसून येते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी आणि अष्टपैलू कलाकाराचा अध्याय संपला आहे.

संबंधित सामग्री

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती आणि निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती आणि निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन

अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती आणि निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन. 2019 मध्ये मुलगी पायललाही गमावले होते.

Nov 13, 2026
विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

Maharashtra Student Suicides: देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आल

Nov 12, 2026
दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

Maharashtra Climate Change: दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागांतून पावसाने माघार घेतली असून, आगामी काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2026
अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली? KBC चं शूटिंग आठवडाभरासाठी थांबवलं; चाहत्यांची चिंता वाढली

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली? KBC चं शूटिंग आठवडाभरासाठी थांबवलं; चाहत्यांची चिंता वाढली

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे KBC च्या शूटिंगला आठवडाभराचा ब्रेक? दिवाळी विशेष भागांचं प्रसारण सुरू.

Nov 07, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026