परभणीतील खरबा रोडवरील रुढी पाटीवरील घटना
परभणी/मानवत (Manvat Accident) : भरधाव वेगाने येणार्या एका स्कुलबसने रस्त्याने आजोबा सोबत पायी जाणार्या ३ वर्षीय बालिकेला उडविले. ही घटना सोमवार २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास रुढी पाटीवर घडली. यात बालिकेचा मृत्यू झाला असून (Manvat Accident) अपघातानंतर चालक पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील खरबा येथील मुंजा आसाराम निर्वळ यांची ३ वर्षीय पुतणी शिवाज्ञा दत्ता निर्वळ ही सोमवार २२ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आजोबासोबत शेतात जात होती. (Manvat Accident) खरबा रोडवरील रुढी पाटीवर आल्यानंतर जून्या पाण्याच्या टाकीजवळ एका खाजगी शाळेच्या स्कूलबस चालक रामेश्वर उर्फ राजेभाऊ पितळे याने आपले वाहन भरधाव वेगाने चालवून शिवाज्ञा दत्ता निर्वळ हीस जोराची धडक दिली.
घटनास्थळी जमा झालेल्या नामदेव मच्छींद्र निर्वळ, विठ्ठल सोपानराव निर्वळ यांच्या मदतीने मुंजा निर्वळ यांनी बालिकेला मानवत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत मुंजा आसाराम निर्वळ यांनी स्कूलबस चालकाविरुध्द तक्रार दिली आहे. चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक रामेश्वर पितळे याच्या विरुध्द (Manvat Accident) मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.