रुढी पाटीवर मानवत पोलिसांची कारवाई
दहा लाखाचा मुद्देमाल जप्त
परभणी/मानवत (Manvat Crime) : तालुक्यातील रुढी पाटीवर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर मानवत पोलिसांनी रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पकडला. चार ब्रास वाळूसह पोलिसांनी एकुण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मानवत पोलिसांचे पथक रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी गस्त घालत असताना खरबा गावाकडून विना नंबरचा हायवा अवैध वाळू उपसा करुन वाहतुक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या (Manvat Crime) माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला असता सदर वर्णाचा हायवा दिसून आला. यावेळी सपोनि. संदीप बोरकर, पोह.गोविंद वड, पोना.विलास मोरे, पोशि शेख रफिक या पोलिस कर्मचार्यांनी इशारा करुन वाहन थांबविले.
चालक मोसीन महेमुद शेख ३५ वर्ष, रा.कुंभारी पिंपळगाव जि. जालना हा गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत आढळून आले. मानवत पोलिसांनी हायवा वाहनासह चालकास ताब्यात घेतले. या (Manvat Crime) कारवाईत जवळपास १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि.संदीप बोरकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.