रामपुरी ते मंगरुळ रोडवर कारवाई; सहा जुगार्यांवर गुन्हा
परभणी/मानवत (Manvat Crime) : येथील पोलिसांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास रामपुरी ते मंगरुळ जाणार्या रोडवर एका लिंबाच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार्यांवर कारवाई केली. रोख रक्कमेसह दुचाकी मिळून २ लाख ७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण सहा जुगार्यांवर मानवत पोलिसात (Manvat Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि. संदिप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अनिल खिल्लारे, पोलिस अंमलदार भारत नलावडे, महेश रनेर, विजय लबडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. रामपुरी ते मंगरुळ रोडवर एका लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत बसले होते. या ठिकाणी छापा टाकण्यात आला. लक्ष्मण रामदास घुंगासे, मिलिंद कोंडीराम घटे, विठ्ठल किशन घटे, रवि देविदास इंगळे, विष्णु गंगाराम करकडे, वसंत शंकरराव गायकवाड यांच्यावर (Manvat Crime) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास बीट जमादार भारत नलावडे करत आहेत.