परभणी/मानवत (manvat Suicide Case) : किडनीच्या आजारामुळे सततचे डायलिसीस आणि रुग्णालयात होणार्या खर्चाला कंटाळून एका चाळीस वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही (Suicide Case) घटना बुधवार १९ जून रोजी सकाळी सात वाजता मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीत घेतली उडी, मानवत पोलीसात नोंद
सावित्रा बन्सी खटे वय ४० वर्ष रा. इटाळी, असे मयत महिलेचे नाव आहे. या बाबत मयताचे भाऊ बाबु बन्सी खटे यांनी खबर दिली आहे. महिलेला मागील बर्याच दिवसांपासून किडनीचा आजार होता. तिचा उपचार सुरू होता. सततचे डायलिसीस आणि रुग्णालयात होणार्या खर्चामुळे महिला तणावाखाली होती. १८ जुनला रात्री सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यावर महिला घरात आढळली नाही. तिचा शोध घेतला असता इटाळी शिवारातील विहिरीत सकाळी सातच्या सुमारास (Suicide Case) महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळाला पोउपनि. दिगंबर पाटील, बीट अंमलदार भारत नलावडे, विजय लबडे यांनी भेट दिली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मानवत पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून (manvat Police) मानवत पोलीस अधिक तपास करत आहेत.