रिसोड (Washim):- एकीकडे निवडणूक आयोग कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी बारकाईने लक्ष घालून प्रत्येक बाबीवर जनजागृती पथनाट्य व विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून मतदारांनी मतदान (voting)करावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने वय वर्ष 85 च्या वरील मतदार व तसेच दिव्यांग मतदारही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी घरपोच मतदानाची सुविधा सुरू केलेली आहे.
दिव्यांग मतदारही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी घरपोच मतदानाची सुविधा सुरू
मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाच्या निवडणूक (elections)कामामुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल 300 मतदार हे मतदानापासून वंचित राहणार आहे. याचे कारण म्हणजे निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी ज्या खाजगी वाहनाचा समावेश निवडणूक मध्ये मतदान केंद्रावर जाण्याकरता समावेश केलेला आहे असे खाजगी वाहनावरचे चालक हे मतदानापासून वंचित राहणार हे मात्र नक्की. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशानुसार निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या म्हणजे 19 नोव्हेंबरला वाहन चालकांना वाहनासह ठराविक वेळ व ठराविक ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी समावेश असलेल्या खाजगी वाहनधारकांना आपले वाहन घेऊन उपस्थित राहावेच लागणार आहे. यामुळे सदर मतदार वाहन चालक हे मतदार (Voters)त्यादिवशी मतदानापासून वंचित राहणार असल्याने निवडणूक आयोगाच्या या कार्यशैलीबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. यामध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोग (Election Commission) व जिल्हाधिकारी यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष घालून सदर मतदारांना पोस्टल बॅलेट ची सुविधा करून देण्यात यावी जेणेकरून मतदार मतदानापासून वंचित राहणार आहे अशी मागणी सदर वाहन चालक यांच्याकडून केली जात आहे.