शेतकरी वर्गाची बनली डोकेदुखी
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (lack of E-KYC) : शासनाच्या जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना मोबाईल वर ‘केवायसी’कशी करावी तसेच अनेका जवळ महागडा मोबाईल नाही. त्यामुळे (E-KYC) ई केवायसी अभावी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या अनुदाना पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
चिखली तालुक्यातील मेरा बु सर्कल मध्ये २६ गावाचा समावेश असून जास्तीत जास्त जमिन ही कोरडवाहू व डोंगराळ स्वरूपाची आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी खरीबाची पेरणी लवकरच करून टाकतात . त्यांमध्ये मागील वर्षी ऐन पिकामध्ये दाने भरण्याच्या वेळेतच मुसळधार पावसाने हजेरी लावून सोयाबिन व कपाशी पिकाचे अतोनात नुकसान होवुन गेले. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले परंतु या खरिब हंगामाच्या नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या (E-KYC) ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची नावं, त्यांच्या बँकेचं नाव, खातं क्रमांक, आधार क्रमांक अशी माहिती अपलोड करण्याचे बंधने घातली.
त्यांमध्ये काही शेकऱ्याजवळ महागडा मोबाईल असल्याने त्यांनी शेतात जावून मोबाईल वर ई केवायसी (E-KYC) केली. मात्र काही शेतकऱ्यांकडे महागडा मोबाईल नसल्याने त्यांच्याकडुन ही माहिती अपलोड होवू शकली नाही त्यामुळे ई केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई परत जाण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे कृषी सहाय्यक, तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी हजार रुपये खर्च करून ऑनलाईन सेंटर वत रांगाच रांगा लावून कागदपत्रे अपलोड केली आणि ऑफलाईन अर्ज अधिकारी वर्गाकडे दिले.
परंतु वेळोवेळी संबधित कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करत संपुर्ण अर्ज आले नाही, अर्जात कागदपत्रे कमी आहेत, असे सांगून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे. त्यातच विमा कंपन्या सुध्दा शेतकऱ्यांना जाचक अटीं लावून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरी सरकारने विमा कंपन्यांना सक्तीचे आदेश देवून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.