अफगाणिस्तान (Kabul):- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून(Kabul) एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मोठा स्फोट (explosion) झाला आहे. या स्फोटात तालिबानचे स्थलांतर मंत्री आणि तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका खलीलुर रहमान हक्कानी यांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे.
रहमान हक्कानी आणि त्याच्या ३ अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू
या स्फोटात खलील रहमान हक्कानी आणि त्याच्या ३ अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या स्थानिक मीडिया टोलो न्यूजने या हल्ल्याची माहिती दिली आहे. हक्कानी (Hakkani)खोस्तमधील लोकांच्या एका गटाला होस्ट करत असताना हा हल्ला झाला. हा स्फोट कसा झाला आणि कोणी घडवून आणला याबाबत सध्या फारशी माहिती समोर आलेली नाही.
इस्लामिक स्टेट (Islamic State) आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान हा हल्ला लक्ष्यित हल्ला असू शकतो, असा दावा अहवालात केला जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या प्रकरणाची जबाबदारी घेतलेली नाही.